विस्मरण
मन यांच्या मते, "साठवण प्रक्रियेतील/धारणा करण्यातील अपयश म्हणजे विस्मरण होय.
विस्मरण सिद्धांत
(Theories of Forgetting)
विस्मरण का होते याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे. याबाबत अनेक सिद्धांतसुद्धा शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे
१) व्यत्यय सिद्धांत (Interference Theory) -
स्मृतीमध्ये साठविलेल्या एका माहितीचा दुसऱ्या माहितीवर प्रतिकूल परिणाम होणे, एका माहितीने दुसऱ्या माहितीची जागा घेणे किंवा एका माहितीचा दुसरी माहिती आठविताना अडथळा येणे म्हणजेच व्यत्यय होय. या सिद्धांताला 'निरोधन सिद्धांत' असेसुद्धा म्हणतात. या सिद्धांतानुसार अध्ययनानंतर अध्ययनासाठी व्यत्यय आल्यामुळे विस्मरण घडून येते. यामध्ये दोन प्रकारचे व्यत्यय घडून येतात. एक म्हणजे भूतलक्षी व्यत्यय होय, जेव्हा नंतरच्या अध्ययनामुळे पहिल्या अध्ययनाच्या धारणेत घट होवून जाते किंवा पहिले अध्ययन साहित्य आठवू शकत नाही यास भूतलक्षी व्यत्यय असे म्हणतात. उदा. अभ्यास करीत असतांना नंतरच्या अभ्यासामुळे आधीचा अभ्यास आठवायला अडचण येते.
दुसरा व्यत्यय म्हणजे भविष्यालक्षी व्यत्यय होय. पहिल्या अध्ययन साहित्याचा नंतरच्या अध्ययन साहित्यावर परिणाम होणे म्हणजेच नंतरचे साहित्य आठविण्यात अडचण निर्माण होणे. याला भविष्यलक्षी व्यत्यय असे म्हणतात. उदा. पहिली भाषा व्यवस्थित शिकून असल्यास दुसरी मातृभाषा शिकणे फार कठीण जाते किंवा नंतरच्या भाषेतील शब्द आठवण्यात अडचण निर्माण होते.
या सिद्धांतामुळे अध्ययन साहित्यातील हा व्यत्यय टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. महत्वाच्याच घटनांकडे चांगले लक्ष दिले जाते त्यामुळे व्यत्यय कमी होवून स्मृतीत राहणे चांगले पद्धतीने घडून येते.
२) स्मृती व्हास सिद्धांत (Decay Theory) -
विस्मरणाच्या संदर्भात मांडला हा सिद्धांत सर्वात पहिला सिद्धांत आहे. या सिद्धांताला 'अनुशेष सिद्धांत' आणि 'अनुपयोगितेचा सिद्धांत' या नावानेही ओळखले जाते.
या सिद्धांतानुसार जेव्हा एखादी बाब अनुभवली जाते वा एखाद्या अध्ययन साहित्याचे अध्ययन केले जाते, त्यावेळेस त्याचे ठसे स्मृती पटलावर निर्माण होतात. असे अनेक ठसे, अनेक अनुभव असतात. काही काळापर्यंत अशा ठशांना वापरलेच गेले नाही तर हे उसे स्मृतीपटलावरुन नष्ट होतात, नाहीसे होतात वा ऱ्हास पावतात. यास जैविक कारण मानले गेले आहे. मेंदूतील चेतापेशीच्या होत असलेल्या सतत चयापचयामुळे त्यावरील स्मृती कालांतराने फिकी पडत जाते त्यामुळे माहितीचा, ठशांचा ऱ्हास होतो.
Social Plugin