स्मृतीसुधारविद्या तंत्रे(Techniques for Improving Memory)
कामाच्या गोष्टी लक्षात राहाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी संकेतन, साठवण आणि प्रत्यानयनाची क्रिया उत्तम होणे अतिशय आवश्यक असते. म्हणून सुधारण्यासाठी योग्य तंत्राचा वापर करणे अधिक आवश्यक आहे. अशी तंत्रे पुढीलप्रमाणे - --
१) संकेत तयार करणे (Developing Codes) -
बऱ्याच प्रमाणात माहिती असेल तर सरळ सरळ जशीच्या तशी ती माहिती लक्षात ठेवणे शक्य होत नाही. त्यासाठी स्वतःचे संकेत शब्द तयार केल्यास ती माहिती त्या संकेत चिन्हाने व्यवस्थित साठविली जाईल व आठवण्यास सुलभ होईल. त्यालाच 'कोडवर्ड' असे म्हणतात. उदा. 'तानापीहीनिपाजा' हा संकेत शब्द, इंद्रधनुष्याचे सातही रंग दर्शवितो. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा असे ते रंग. असेच पूर्ण राज्याचेही संकेत तयार करता येतात. यामुळे थोडक्या शब्दात मोठी माहिती साठविता येते.
२) खंड विभाजन (Chunking) -
स्मृतीतून व्यवस्थित प्रकारे माहिती साठविण्यासाठी माहितीचे वेगवेगळे खंड केल्यास ती माहिती चांगल्या पद्धतीने संकेताच्या रुपात साठविता येते व आठवण्यास सुलभही जाते. उदा. ९४२२७८२२९८ हा नबर ९४२, २७८, २२९८ असे खंड करुन वाचल्यास तो लक्षात राहण्यासाठी महत्वाची मदत होईल असे अनेक गोष्टींबाबत विभाजन करुन स्मृतीतून योग्यवेळी ते आठविले जातात.
३) प्रतिमांचा वापर (Visual Images) -
अनेक मुद्दे आठविण्याकरीता या पद्धतीचा वापर केला जावू शकतो. बाजारातून सामान आणण्याच्या वेळी आई अनेक वस्तू सांगते आणि आपली त्यावेळी खरीच कसरत लागते. आणि एक ना एक वस्तू तरी आणायची राहून जाते. अशा वेळी प्रतिमांचा वापर केला तर ती समस्या सुटू शकते. उदा. साखर, गाजर, खोबरे, दही, लोणचे, चमचे, डब्बा इ. यासाठी स्वतःहून प्रतिमा तयार करता येतात. 'साखरेच्या पोत्यातून गाजर निघताच खोबऱ्याच्या डोलातून दही व लोणचे केले व चमच्याने डब्यात भरले' असे हे ठसे पक्के होतात व सामान आणण्यास कोणताही अडथळा जात नाही.
४) साहित्याचे संगठन (Organization of Text Material) -
विविध साहित्याची एका संघात विविध टप्प्यावर बांधणी केल्यास म्हणजेच साहित्याचे संगठन केल्यास ती माहिती दिर्घकाळपर्यंत लक्षात राहण्यास मदत मिळते. उदा. एखाद्या मुख्य घटकाचे प्रकार, त्याचे उपप्रकार व त्याचेही उपउपप्रकार अशी ही आकृतीद्वारे मांडणी केल्यास ते संक्षिप्त रुपाने लक्षात राहण्यास मदत मिळते.
५) प्रश्न पद्धती (Questions Method)-
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालावधीम - ध्ये अभ्यासाशिवाय पर्याय नसतो. हा अभ्यास व्यवस्थितपणे लक्षात राहावा यासाठी प्रयत्न चाललेले असतात. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे अभ्यास आटोपल्यानंतर लगेच पाच मिनीटे शांत बसून स्वतःला त्या अध्ययनावर प्रश्न करावे आणि परत ती त्या प्रश्नाने माहिती जागृत होते का? हे पहावे. असे केल्यास अध्ययन दिर्घकालीन स्मृतीमध्ये साठविले जाते. यालाच 'पाठपुरावा' असेही म्हणतात.
६) SQ3R पद्धती (SQ3R Method)-
स्मृतीमधील माहिती व्यवस्थित - आठविण्यासाठी SQ3R ही पद्धती अतिशय महत्वाची मानली जाते.
पाहणी (Survey) :
आपण काय अभ्यासतो याची आधी तपासणी करावी.
मुद्याची तपासणी झाल्यास त्यातील ठळक मुद्यांवर लक्ष द्यावे व स्वतःलाच प्रश्न विचारावे, म्हणजे काय ? कसे ? कोणते ? किती ? इ.
वाचन (Read):
अध्ययन साहित्य वाचन करताना या प्रश्नाची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करावा. असे होत नसेल तर ते साहित्य परत वाचावे.
पठन (Recite) :
अध्ययन साहित्याचे वाचन झाल्यावर पुस्तक बंद करुन किंवा साहित्य बाजूला ठेवून ते परत आठविण्याचा प्रयत्न करा.
पुर्नतपासणी (Review) :
यामध्ये आधीपासून आपण काय वाचले याची परत तपासणी करुन पाहावी, जेणेकरुन कुठे काही सुटते आहे. का? याची प्रचिती येईल.
७) अवधान (Attention) :
स्मृतीत माहिती व्यवस्थित साठविण्यासाठी अध्ययन साहित्यावर वा दैनंदिन जीवनातील गोष्टींवर व्यवस्थित लक्ष देणे अतिशय महत्वाचे असते. उदा. आपल्या डायरीत किती नंबर नोंदविले आहे, खिश्यात किती रक्कम आहे? इ.
८) खाऊन-पिऊन अभ्यासाला बसणे :
अध्ययनाच्या वेळी आपल्याला भूक लागली असेल तर निश्चितच अभ्यासात आपले लक्षच लागणार नाही, त्यासाठी पुरेसे जेवण करुन समाधानाने अभ्यासाला बसणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे अध्ययन करण्यात मन लागेल.
अशाप्रकारे वरील अनेक युक्त्यांचा व तंत्राचा अवलंब केल्यास दैनंदिन माहिती व अध्ययनातील माहितीचे संकेतन, साठवण व प्रत्यानयन व्यवस्थित होवू शकते.
Social Plugin