औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास
The History of I/O Psychology)
औद्योगिक मानसशास्त्राची निश्चित अशी सुरुवात 20 डिसेंबर, 1901 रोजी झालेली आहे. नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात याच दिवशी संध्याकाळी डॉ. वॉल्टर स्कॉट या म मानसशास्त्रज्ञाने जाहिरातीच्या क्षेत्रात मानसशास्त्रीय तत्त्वे कशी वापरावयाची याबद्दल व्याख्यान देऊन चर्चा घडवून आणली (फर्ग्युसन 1962). पुढे यासंबंधीचे 12 लेख मासिकामध्ये प्रसिद्ध झाले. सन 1903 मध्ये त्या लेखांचा स्कॉट यांनी 'जाहिरातीचे सिद्धान्त' (The Theory of Advertising) हा ग्रंथ प्रकाशित केला. निश्चितपणे व्यवसायजगतासाठी मानसशास्त्रीय उपयोजन करण्यासंबंधीचा तो पहिला ग्रंथ होता. स्कॉट यांनी इ.स. 1901 ते 1913 या काळात व्यवसायाबद्दलच्या महत्त्वाच्या घटकांबद्दलचे हे ग्रंथ होते.
ह्युगो मुन्स्टरबर्ग यांनी 1913 मध्ये 'मानसशास्त्र आणि औद्योगिक सक्षमता' (Psychology and Industrial Efficiency) हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाने औद्योगिक मानसशास्त्राच्या विकासामध्ये मोलाची भर घातली. या ग्रंथामध्ये अध्ययन, निरसता, थकवा, भौतिक परिस्थितीतील समायोजन, खरेदी आणि विक्री इत्यादी विषयांवरील माहिती होती. या कार्यामुळे मुन्स्टरबर्गला औद्योगिक मानसशास्त्राचा जनक मानले जाते. औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे म्हणजे पहिले जागतिक महायुद्ध, हॉथॉर्न अभ्यास, दुसरे जागतिक महायुद्ध आणि काल- गती अभ्यास हे टप्पे होत. त्यांची माहिती तपशिलाने पुढीलप्रमाणे -
काल-गती अभ्यास (Time-motion Study)
टेलरने या मानसशास्त्रज्ञाने औद्योगिक क्षेत्रामध्ये लोखंडाच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे प्रत्येक कार्यामध्ये निरीक्षण केले. या कारखान्यात कामगार सर्वसाधारणपणे 12.5 टन लोखंड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असत. टेलरने या कामगारांचे शास्त्रीय निरीक्षण केले. लोखंड वाहून नेण्यासंदर्भात एक योग्य पद्धत विकसित केली. परिणामी, प्रत्येक कामगार 12.5 ऐवजी 47.5 टन लोखंड पूर्वीएवढ्याच वेळेत वाहून नेण्याचे काम करू लागले. साहजिकच सर्वच कामगार यामध्ये यशस्वी झाले नाहीत. बरेचसे कामगार या पद्धतीने काम करू शकले नाहीत. टेलरच्या या अभ्यासातून दिसून आले की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन झाल्यास उत्पादन खर्चामध्येही बचत करता येते. कामगारांची नियुक्ती करणे, त्यांना चांगले प्रशिक्षण देणे आणि कार्यक्षमतेनुसार कामाचा आर्थिक मोबदला देणे आवश्यक आहे. त्यामुळे टेलरच्या या संशोधन कार्याला काल अध्ययन (Time Study) हे नाव पडले.
ग्रिलब्रेथ आणि त्याची पत्नी लिलियन ग्रिलब्रेथ यांनी 1900 मध्ये स्वतंत्रपणे औद्योगिक कार्यावर संशोधन केले. कारखान्यात कार्य करीत असताना बरेच कामगार अनावश्यक क्रिया/ हालचाली करतात. त्या अनावश्यक हालचाली टाळणे हा ग्रिलब्रेथ यांच्या अभ्यासाचा हेतू होता.
ग्रिलब्रेथ यांनी कर्मचारी करीत असलेल्या कार्याचे निरीक्षण करून विशिष्ट हालचालींसाठी लागणाऱ्या वेळेच्या नोंदी केल्या. कार्यातील अनावश्यक हालचाली / क्रिया काढून टाकल्या. त्यामुळे कामगारांकडून जादा उत्पादन वाढविणे शक्य असल्याचे ग्रिलब्रेथ ने दाखवून दिले. त्यांनी एका घरबांधणीच्या कामामध्ये विटा रचण्याचे काम करणाऱ्या कामगाराचे निरीक्षण केले. बांधकाम करताना 15 पौंड वजनाची एक वीट उचलून ती भिंतीवर योग्य जागी ठेवण्यासाठी 18 क्रिया/ हालचाली कराव्या लागत. ग्रिलब्रेथच्या तंत्राचा उपयोग करताच क्रिया/ हालचालींची संख्या 18 वरून 5 वर आली. येथे 13 अनावश्यक हालचाली वगळल्याने एका तासात 150 विटा रचण्याचे काम करणारे कामगार नवीन पद्धतीमुळे तेवढ्याच वेळेत 150 विटांऐवजी 350 विटा रचू लागले, ग्रिलब्रेथने या अभ्यासासाठी कालमापकाचा वापर करून क्रियांच्या गतीची वेळही नोंदविली. प्रत्येक क्रियेला चिन्ह दिले. या चिन्हांना नावे दिली. अनावश्यक हालचाली टाळण्यासाठी आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी काही नियम तयार केले. त्यामुळे औद्योगिक उत्पादन वाढण्यास मोठी मदत झाली.
म्हणून ग्रिलब्रेथ यांचा अभ्यास गती अभ्यास (Motion Study) म्हणून ओळखला जातो. तसेच टेलरच्या कालविषयक तंत्राचा समावेश ग्रिलब्रेथ यांच्या तंत्रामध्ये करण्यात आला. त्यामुळे हा अभ्यास काल आणि गती अभ्यास (Time and Motion Study) म्हणून ओळखला जाऊ लागला.
पहिले जागतिक महायुद्ध
(World War I)
या काळात सैनिक व सैन्य अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मानसशास्त्रज्ञांनी समूह चाचण्या विकसित केल्या. स्कॉट आणि बिंगहॅम यांनी लाखो सैनिकांच्या परीक्षण आणि नियुक्तीच्या संदर्भातील कार्य केले. बिने आणि स्टॅनफोर्ड बिनेच्या वैयक्तिक परीक्षणाच्या चाचण्या होत्या. पण समूह चाचण्या नव्हत्या म्हणून या काळात मानसिक क्षमता मापनासाठी समूह चाचण्यांचा विकास झाला. सुशिक्षितांसाठी आर्मी अल्फा व अशिक्षितांसाठी व परभाषिकांसाठी आर्मी बिटा चाचणी तयार केली. या चाचण्यांवर उच्च गुणांक मिळविणाऱ्यांची सैन्य अधिकारी पदावर तर थोडे कमी गुणांक मिळविणाऱ्या व्यक्तींची सैनिक पदावर निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले गेले. याच काळात वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ जे. बी. वॉटसन अमेरिकन सैन्य दलामध्ये मेजर पदावर कार्यरत होते. त्यांनी वैमानिकांसाठी संवेदन चाचण्या विकसित केल्या. "Journal of Applied Psychology या नावाने 1917 मध्ये पहिले जर्नल प्रसिद्ध झाले. या जर्नलमधील लेखांमुळे औद्योगिक मानसशास्त्राचे उपयोजित क्षेत्र विस्तारण्यास मदत झाली.
पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात उद्योगजगताने प्रथमच औद्योगिक मानसशास्त्रामध्ये अभिरुची दाखविण्यास सुरुवात केली. प्रॉक्टर आणि गॅम्बल फिलाडेल्फिया कंपनी आणि हॉथॉर्न वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीने स्वतंत्ररीत्या कर्मचारी संशोधन कार्यक्रम सुरू केले. यामध्ये मानसशास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे आहे.
हॉथॉने अभ्यास
(Hawthorn Studies)
एल्टन मेयो यांनी शिकागो परिसरातील हॉथॉर्न वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये सन 1927 पासून सलगपणे 12 वर्षे संशोधन अभ्यासाची मालिका राबविली. हा अभ्यास हॉबॉन कंपनीमध्ये केल्याने याला हॉथॉर्न अभ्यास (Hawthorn Studies) असे म्हणतात.
Social Plugin