आदर्श व्यकतिमत्त्व घडणीसाठी आवश्यक गोष्टी
(Strategies for Personality Development)
१) आत्मनिरीक्षण : स्व-जाणीव (Self Awareness) :
स्वतःचे आंतरिक, खरेखुरेल्यमापन करा. कोणत्या बाबी तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने करता येतात, त्याची यादी बनवा. कोणत्या बाबी तुम्ही फक्त करू शकतात. त्यात निपुणता नाही. आणि कोणत्या बाबी अजिबातच येत नाही. परंतु त्या तुम्हाला याव्या असे वाटते. या सर्वांची यादी बनवा.
२) वाचन करा :
चांगल्या वाचनाने स्वतःचा विकास नक्कीच होतो. म्हणून तुम्ही स्वतः ठरवा कोणते पुस्तक, कोणते जर्नल, माहिती तुम्हाला वाचायची आहे. एक गरज पूर्ण झाली की, मानव दुसरी गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. ती पूर्ण झाली की, तिसरी याप्रमाणे गरजा पूर्ण करता करताच व्यक्तीचा विकास होत जातो. चांगल्या लेखकांची पुस्तके वाचल्याने अनेक कौशल्यांचा विकास होतो. जसे एकाग्रता, समानानुभूती, चिकित्सक, सर्जनशील विचार इत्यादी.
३) मार्गदर्शक शोधा :
ज्या गोष्टीत तुम्ही कमी आहात, त्यात सुधारणा करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची निवड करा. मार्गदर्शकाचे वय बघितले जात नाही तर त्याचे कौशल्ये बघितली जातात, ज्यावर तुम्ही विश्वास करू शकतात, असाच मार्गदर्शक निवडा.
४) स्वतःच्या विकासासाठी योजना (Plan) कार्यनीती तयार करा :
तुम्हाला भविष्यात काय व्हायचे आहे ? तुम्ही स्वतःला कोणत्या ठिकाणी पाहू इच्छिता? म्हणजेच स्वतःच्या जीवनाचे धैर्य ठरवले पाहिजे. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या जीवनाचे धैर्य ठरवणार तितक्या लवकर तुम्हाला ते प्राप्त करण्यासाठी योजना, कार्यनीती (Action Plan) तुम्हाला तयार करता येतील. त्या कार्यनीतीच्या अंमलबजावणीमुळेच तुम्हाला आत्मप्रेरणा मिळून तुम्ही प्रगतीशील होणार.
५) आपल्या यशाच्या नोंदी ठेवा:
तुम्ही जी कौशल्ये गुण, क्षमता, चांगल्या सवयी, निपुणता मिळवत जाणार आहात. त्यांच्या नोंदी डायरीत ठेवा. जेणेकरून स्व-प्रेरणा तुम्हाला प्राप्त होणार. तुमच्या ध्येयापासून तुम्ही किती दूर आहात, याचादेखील आढावा घेता येईल.
६) समूह बनवा :
तुम्हाला जीवनात जे मिळवायचे आहे म्हणजेच तुमचे ध्येय आणि तुमच्यासारखेच ध्येय ठेवणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या मित्रांचा समूह बनवा. स्व-विकास करायचा असेल तरी ही दुसऱ्या व्यक्ती ज्या तुमच्यासारखेच कार्य करत आहात. त्यांच्या समूहात तुम्ही राहिलात तर तुमचा विकास लवकर होईल. अभ्यास करत असतांना तो इतरांसोबत चर्चा करून केला तर लवकर लक्षात राहते. इतरांचे अनुभव, त्यांना पडलेले प्रश्न, अडचणी यादेखील आपल्यासमोर येतात आणि त्यातून आपण बरेच काही शिकत जातो.
७) स्वतःच स्वतःचे न्यायाधीश बना:
इतरांना दाखवण्यासाठी तुम्ही दिवसभर पुस्तक हातात धरून ठेवणे किंवा ऑनलाईन क्लास करण्याचा बहाणा करून तुम्ही गाणे ऐकत असाल तर तुमचा स्वतःचा विकास होऊ शकत नाही. पालकांनी, भावडांनी, मित्रांनी सांगून तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही एका पातळीपर्यंत यशस्वी होऊ शकतात. पण तुमचे ध्येय, आत्मविकास होईलच असे नाही. म्हणून स्वतःच स्वतःचे न्यायाधीश बना आणि आपल्या कार्याचे मूल्यमापन करा.
८) आपल्या यशाची- अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारा :
काही व्यक्तींना संरक्षण यंत्रणेचा जास्तच वापर करून नेहमीच आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर टाकण्याची वाईट सवय असते. उदा. परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही तर पेपर कठीण होता. माझ्या आई- बाबांनी मला क्लास लावून दिला नाही. पेपर लवकर घेतला. पाहुणे आलेले होते म्हणून अभ्यासच झाला नाही, अशी अनेक कारणे सांगता येतात. परंतु ज्याला खरोखरच प्रगती करावयाची आहे. तो कोणतेच कारण पुढे न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. उदा. माझे नशीबच चांगले नाही. नाहीतर त्या अरचूचे नशीब केवढे चांगले. सर्व प्रश्न तीने वाचलेलेच आले. आपल्या अपयशाचे खापर नशिबावर न फोडता आपल्या कार्याला, कर्माला, कृतीला कारणीभूत ठरवा .
वेळेचे व्यवस्थापन
वेळेच्या व्यवस्थापनाची आठ मूलभूत तत्वे(Fundamental Principle of Time Management)
वेळेच्या व्यवस्थापनाची पुढील आठ तत्व तुम्हाला तुमच्या व्यवसायात व आयुष्यातही स्पर्धात्मक उंचीवर नेतील.
१. आपले ध्येय निश्चित करा:
ध्येय, मग ते पदवी मिळवणे असो, नोकरी मिळवणे असो की उच्च शिक्षणाचे असो, निश्चित असे ध्येय प्रथम ठरवा.
२. ध्येयानुसार आखणी करा :
ध्येय साध्य करण्यासाठी योग्य तो कार्याचा क्रम ठेवा. आखणी करतांना त्यात लवचिकता ठेवा तसेच काही सबळ कारण असल्याशिवाय उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वी तुमच्या कार्यात खंड पडू देऊ नका. आपले सर्व ध्येय अंतिम ध्येयाकडे केंद्रित करून तुमची वाटचाल चालू ठेवा.
३. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा :
तुमच्या ध्येयाला तुम्हीच प्रथम प्राधान्य बनवा. असे केल्याने तेव्हा इतर कोणत्याही गोष्टी अथवा अपेक्षा तुम्हाला मागे खेचायचा प्रयत्न करतील तेव्हा सुद्धा तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका. अडचणींवर मात करा.
४. स्वतःचा वेग ठरवा :
असे म्हटले जाते की, 'रोम शहर एका दिवसात बांधून झाले नव्हते. ही एक महत्वाची संकल्पना आहे. आणि तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नामध्ये तिला विचारात घेणे गरजेचे आहे. कामाचा वेग तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करता येईल अशा रितीने ठरवा. जर एखादे काम तुम्ही घाईगडबडीने केले आणि ते चांगल्या तऱ्हेने झाले नाही तर असे निष्काळजीपणाने केलेले काम तुमचा व तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांना हिरमोड करेल. कुशल व प्रभावी कामासाठी स्थिर गतीची आवश्यकता असते. ठराविक काळानंतर विश्रांतीची गरज असते. ती आपण घेतली पाहिजे मग ही विश्रांती काही तास काम केल्यावर, काही दिवसाच्या शेवटी व काही आठवड्याच्या शेवटी सोयीनुसार घेतली पाहिजे.
५. स्वतःचे स्वतःच आत्मपरिक्षण करा:
प्रत्येकाला स्वत:च SWOT Analysis करता आले पाहिजे. माझी बलस्थान कोणते ? माझ्यातील कमतरता कोणत्या ? माझ्यात असलेल्या बलस्थानानुसार मला कोणत्या संधी उपलब्ध आहे ? प्रत्येक संधीत माझ्यातील कमतरतेनुसार कोणते धोके संभवतात ? हे धोके टाळण्यासाठी मला माझ्यातील कमतरता, बलस्थानात कशा बदलवता येतील याचा विचार प्रत्येकाने करून स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक झाले पाहिजे.
६. मार्गदर्शक शोधा, मार्गदर्शक बना :
जे तुम्हाला अचूक मार्गदर्शन करतील त्यांच्याकडून जरूर मार्गदर्शन घ्या. मात्र तुम्हाला स्वतःचे मार्गदर्शन स्वतः शोधण्यास मदत करतील असाच उत्तम मार्गदर्शक असतो हे सदैव लक्षात ठेवा. हळूहळू स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक व्हा.
७. प्रत्येक यशाबद्दल स्वतः स्वतःला बक्षीस द्या :
बक्षीसाची पद्धत नेहमीच उपयुक्त ठरते. मग हे बक्षीस तुमच्या आवडत्या स्थळाची सहल असो अथवा आवडत्या पदार्थाची असो ते तुम्हाला प्रेरणादायी ठरत असते. आपण ठरविलेल्या वेळात काम पूर्ण होणे हेही एक स्वतःला मिळालेले बक्षीसच आहे. प्रत्येक यशाकडे व अपयशाकडे सुद्धा सकारात्मकतेने पाहण्याची सवय लावून घ्या.
८. स्वयं व्यवस्थापन :
आपण तंत्रज्ञान व वेळ यांच्या ताब्यात न जाता या गोष्टींना आपल्या ताब्यात ठेवण्याची कला अवगत करायला हवी ही कला स्वयं व्यवस्थापनामुळे साध्य होते. कारण शेवटी मिटिंगमध्ये असतांना, सिनेमा पाहतांना, रात्री झोपतांना किंवा सुट्टीच्या वेळी तुमचा मोबाईल बंद ठेवण्याकडे तुमचा कल नसला तरीही तस करण्याची क्षमता तुमच्याकडे नक्कीच असते. निर्णय तुमचा असतो. जेव्हा तुम्ही अत्यंत महत्वाचे काम करीत असाल आणि एखाद्या कार्यक्रमाला जाण्याबाबत मित्रमंडळी आग्रही असतील अशा वेळेस नाही म्हणायला शिका.
Social Plugin