प्रेम नातेसंबधं - (Love - relationship
डेंटिंग(Dating)
लिव्ह इन (Live in)
संबंध संपणे(Break ups)
प्रेम ही अत्यंत विस्तृत व सर्वव्यापी संकल्पना
आहे. प्रत्येक नातेसंबंधात प्रेमाची भावना असतेच. आईचे मुलाविषयी, मुलांचे आई-वडीलांविषयी, गुरूंचे शिष्याविषयी, पती-पत्नी, बहिण भाऊ असे अनेक घनिष्ठ नातेसंबंधात प्रेमाची भावना असते. घनिष्ठ नातेसंबंध हे एकमेकांवर आणि परस्पर संबंधांवर अवलंबून असतात. या संबंधातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. विशेषत: एखाद्या व्यक्तीचे विचार, राहणीमान व भावनांचा प्रभाव पडत असतो व त्या संबंधातून ते सर्वजण एकत्रित काम करीत असतात. प्रत्येक कुटूंबात एक नातेसंबंधाचे जाळे तयार झालेले असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मते प्रेम हे प्रणयाधिष्ठित जोडीदारावर अवलंबून असते. तसेच पती पत्नी मधील संबंध देखील प्रणयावर अवलंबून असते.
प्रणय भावनेवर आधारलेल्या प्रेमात शारिरीक जवळीकता महत्वाची मानली जाते. शारिरीक जवळीकतेची व्याप्ती चुंबन घेणे, हात पकडणे, मिठीत घेणे, यापुरती मर्यादित असेल किंवा त्यात परस्परांशी केलेल्या विविध लैंगिक कृतींचा समावेश असू शकेल. गेल्या काही दशकात सांस्कृतिक व सामाजिक बदल खुप झपाट्याने घडून आले आहेत की, डेंटिंग, एकत्र फिरणे, स्टडी करणे, लग्न न करता एकत्र राहणे, लग्न एंगेजमेंट करून त्यांचा ठेवणे यासारखे प्रणय भावनेवर आधारित नातेसंबंध उदयास आलेले आहेत की, नीटसा अर्थसुध्दा कळेनासा झालेला आहे. परंतु या प्रत्येक शब्दामधून प्रणयभाव, उत्कटप्रेम, लैंगिक आकर्षण असण्याची दाट शक्यता आहे.
वरील काही नातेसंबंधाचा थोडक्यात विचार करू.
१) डेटिंग (Dating) :
डेटिंग या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीसोबत विशिष्ट दिवशी किंवा तारखेला ठराविक वेळी सोबत जाणे, फिरणे, एकत्र वेळ घालवणे होय. सर्व जगभरात चालणारा डेटिंग प्रकार आहे. डेटींगसारख्या नातेसंबंधात प्रणयभावनेला, लैंगिक संबंधाला अधिक महत्व दिले जाते. वास्तविक डेटिंगमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत काही काळ घालवणे इतकाच अर्थ अभिप्रेत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी डेटिंग या प्रकाराकडे लैंगिक संबंध इतक्याच दृष्टीकोनातून बघत असतात.
बरेच तरूण-तरूणी डेटिंग हा शब्द कॉमन अर्थाने वापरतात. परंतु त्यांना डेटिंग चा खरा अर्थ माहित नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी प्रथमच डेटिंगला जात असेल तर अशा वेळी काहीतरी अनिष्ठ घडण्याची शक्यता असते. उदा. बलात्कार, हिंसा, मारझोड, ब्लॅकमेलींग इ. म्हणून अगोदरच डेंटींग या प्रकाराची माहिती असणे आवश्यक आहे. बहुतेक मुली डेटिंगला गेल्यानंतर उदा. बलात्कार, विनयभंग, हिंसा, ब्लॅकमेल इ. प्रकारांना सामोऱ्या गेलेल्या आहेत. म्हणूनच डेटिंगसारख्या प्रकारात जोडीदार व्यक्ती ओळखीची व समविचारी असणे आवश्यक असते. स्वान दि-ला- रोन्ह आणि हिक्सन (१९९४) यांच्या मते डेटिंगसारख्या नातेसंबंधात म्हणजे जेथे प्रणयभावना केंद्रस्थानी असते, अशा संबंधात आपल्याला अनुकूल मत असेल. आपली स्तुती, कौतुक होईल, समविचारी आणि सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या जोडीदारासोबत डेंटिंगला जाण्यास अधिक महत्व दिले जाते.
साधारणपणे डेंटिंग या प्रकारावर संस्कृती आणि वातावरणाचा प्रभाव पडत असतो. पाश्चात्त्य देशात अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशात डेटींगचा प्रकार सर्रास चालतो. भारतीय संस्कृतीत अशा नातेसंबंधावर बंधने येतात. भारतात बहुतेक मुलांचे विवाह हे पालक ठरवत असतात. त्यामुळे लग्नाच्या अगोदर भावी जोडीदारांसोबत फिरणे, बोलणे इ. पर्यंत डेंटिंग हा प्रकार मर्यादित असतो. डेंटिगबाबतच्या दृष्टीकोनातही लिंगभिन्नता दिसून येते. डेटिंग या प्रकारात स्त्रियांची भावना प्रेमाची, प्रणयाची असते तर पुरूष मात्र लैंगिकतेला अधिक महत्व देतात. प्रेमभावनेला त्यांच्या दृष्टीने अधिक महत्व नसते.
डेटिंग या प्रकाराचे अजून एक महत्वाचे वैशिष्टये म्हणजे हिंसात्मक वर्तणूक होय. डेंटिंग करणाऱ्या जोडीदारास शारिरीक दुखापत सहन करावयास लावतो. शुगरमॅन आणि होल्डिंग (१९९०) यांच्या अहवालानुसार ४०% अमेरिकन महिलांना आपल्या डेंटिग करणाऱ्या जोडीदाराकडून हिंसात्मक वर्तणूक मिळाली आहे. असे असले तरी डेंटिगचे प्रमाण वाढतच आहे, सध्या ऑनलाईन डेंटिंग हा नव्याने दिसून येणारा प्रकार आहे. यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून ओळख होते व इंटरनेटवरच डेंटिगसाठी बोलावले जाते.
२) लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship):
ज्या व्यक्ती विवाह न करता पती- पत्नीप्रमाणे एकत्र राहतात, लैंगिक संबंध प्रस्थापित करतात. त्यांच्या संबंधाना लिव्ह इन रिलेशनशिप किंवा विवाह न करता एकत्र राहणे संबोधले जाते.
ज्या व्यक्ती विवाह न करता एकत्र राहत असतात त्यांची कारणे वेगवेगळी असतात. काही व्यक्ती या समलिंगी असतात. त्यामुळे अशा संबंधाना समाज विवाहाची मान्यता देत नाही, त्यामुळे या व्यक्ती विवाह न करता एकत्र राहतात. काही अविवाहीत जोडपी आर्थिक जबाबदारी नको या भावनेतून विवाह न करताच एकत्र राहत असतात. बऱ्याच तरूणांना असे वाटत असते की, विवाह न करता एकत्र राहिल्याने आपले स्वातंत्र्य अबाधित राहील. अशा संबंधात कुठलीही कायदेशीर बाब येत नसल्याने उदा. आर्थिक खर्च, मालमत्ता याशिवाय आपसात मतभेद झाल्यास परस्पर संमतीने वेगळे होता येते. त्यामुळे अशा संबंधाकडे तरूणांचा अधिक कल दिसून येतो. परंतु अशा संबंधातून निर्माण झालेल्या वारसांचा/अपत्यांचा भविष्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळेच बहुतेक देशांमध्ये अशा नातेसंबंधाना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. भारतातही दिल्ली उच्च न्यायालयाने १० ऑगस्ट २०१० रोजी कायदा संमत केला आहे. या कायद्यानुसार दोनापेक्षा अधिक वर्ष जर स्त्री पुरूष विवाह न करता एकत्र राहत असतील तर अशा संबंधाना कायदेशीर मान्यता देण्यात येईल. तसेच अशा संबंधातून झालेल्या अपत्यांना कायदेशीर वारसाहक्क मिळेल व इतर आर्थिक संपत्तीत देखील हक्क सांगता येईल.
३) संबंध संपणे (Break Ups)
कोणत्याही नातेसंबधांत डेंटिंग, लिव्ह इन, विवाह यामध्ये जोडीदारात मतभेद निर्माण झाल्यास त्यातून संषर्घ निर्माण होतो. संघर्षाचा परिणाम म्हणजे जोडीदारांमधील संबंधाला तडा जाऊन आपआपसातील संबंध संपुष्ठात येतात.
पती पत्नी असो किंवा इतर व्यक्ती यांच्यात जेव्हा वैचारिक मतभेद निर्माण होतात तेव्हा दोघांपैकी एकही माघार घेण्यास तयार नसतो. परिणामतः तीव्र मानसिक दुःख आणि राग या गोष्टी तीव्र रूप धारण करतात. त्याचा शेवट घटस्फोटात होतो...
घटस्फोट आणि विलगता यांद्वारे पती पत्नी संबंधामध्ये दुरावा निर्माण होतो. निरंतर टिकणारी मैत्री, परस्परांना अनुरूप असणारी पार्श्वभूमी समान आवडी- निवडी अभिरूची सवयी आणि मूल्ये नसतील तर पती पत्नीमध्ये विलगता निर्माण होणे. परस्पराकडे आकर्षिले जाण्याऐवजी त्यांच्यात मतभिन्नता निर्माण होते. विवाहित व्यक्तींना जोडीदारांशी संबंध संपण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. अशा जोडप्यांच्या आई-वडीलांना व मित्रांना मोठा मानसिक धक्का बसतो. कौटूंबिक स्थैर्य नाहीसे होते. एकाकीपणाची भावना निर्माण होते व त्यातून येत असते.
थोडक्यात संबंध कोणतेही असो, डेंटिंग, विवाह, लिव्ह-इन यापैकी कुठलेही संबंध जेव्हा संपुष्टात येतात तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम व्यक्तीवर होत असतात.
संबंध संपुष्टात येण्याची काही कारणे सांगता येतील.
- जोडीदाराबद्दल चूकीच्या किंवा अवास्तव अपेक्षा ठेवणे व त्या पूर्ण न झाल्यास मतभेद होणे.
- जोडीदाराबद्दल संशय बाळगणे, आपल्या जोडीदाराचे दुसऱ्या कोणाशी संबंध आहे असा संशय घेऊन संबंध संपवणे.
- जोडीदारामधील वयातील फरकामुळे मतभेद होणे. जोडीदार खूपच लहान किंवा वयाने मोठा असेल तर वैचारिक मतभेद होतात.
- जोडीदारामुळे करियरकडे किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. या भावनेने शिक्षणासाठी किंवा करियरसाठी संबंध संपुष्टात आणले जातात.
- डेंटिंग, लिव्ह इन यासारखे संबंध हे अधिकत्तर शारिरीक आकर्षणातून निर्माण झालेले असतात. त्यामुळे जेव्हा शारिरीक आकर्षण कमी होते तेव्हा आपोआपच असे संबंध संपुष्टात येतात.
- व्यक्तीला एकाकीपणा वाटतो, त्यातून व्यक्ती वैफल्यग्रस्त होते.
- व्यक्ती निराश, दुःखी कष्टी बनते. परिणामतः व्यक्ती अवसादग्रस्त बनते.
- जीवनाविषयीचा नकारात्मक दृष्टीकोन बनतो. आयुष्यात काहीच करण्यासारखे नाही अशी भावना प्रबळ बनते. त्यातूनच व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते.
- भूक मंदावते, तीव्र दु:ख वेदनांमुळे डोकुदुखी वाढते. इतर शारिरीक तक्रारी निर्माण होतात.
- व्यक्ती जुन्या आठवणीत रमते. अतिभावनावेगाने जोरात किंचाळते, रडते.
यासारखे अनेक नकारात्मक परिणाम संबंध संपुष्टात आल्यानंतर दिसून येतात. (Rohde & Seeley 1999) यांना असे आढळून आले की, जेव्हा प्रणय संबंध संपुष्टात येतात.
तेव्हा व्यक्तीत सुरूवातीला उदासिनता आणि अवसादी भावना निर्माण होत असतात. परंतु यातून व्यक्तीला बाहेर पडता येऊ शकते.
यासाठी खालील उपाय सुचविलेले आहेत.
- आपल्या स्वतःच्या भावना ओळखा.: राग, संताप, दुःख, आराम, भीती अशा संमिश्र भावा अनुभवास येतात. त्यातील महत्वाच्या भावना कोणत्या ते ओळखा. नकारात्मक भावनांना दडपून टाका किंवा काढून टाका.
- स्वतःच्या भावना व्यक्त करा. आपल्या भावना इतरांना व्यक्त करून दाखवा, भावना व्यक्त केल्याने ताण कमी होत असतो.
- स्वतःचे ध्येय ठरवाः एखादे नाते संपले तरी आयुष्यात करण्यासारखे खूप काही असते हे लक्षात घेऊन स्वतःचे ध्येय ठरवा व त्यानुसार वर्तन करा.
- नवीन मित्र-मैत्रीण करा.: संबंध संपल्यानंतर एकाकी वाटत असेल तर नवीन मित्र-मैत्रीण जोडा, सामाजिक संपर्क वाढवा.
- स्वतःला व्यस्त ठेवा. : साधारणपणे व्यक्ती रिकामी असेल, एकटी असताना नकारात्मक विचार अधिक करते म्हणून स्वतःला कुठल्यातरी कार्यात गुंतून ठेवा. सतत व्यस्त राहिल्याने मनात नकारात्मक विचार येणार नाही.
- छंद जोपासाः लेखन, वाचन, चित्रकला, गृहकाम यासारखे विविध छंद जोपासा. त्यातून आनंद मिळेल.
- फिरायला जाः विविध स्थळांना भेटी दिल्याने मनावरचा ताण कमी होतो. म्हणून विविध स्थळांना भेटी द्या.
Social Plugin