आशावादीवृत्तीमुळे शारीरिक/मानसिक आरोग्य कसे वृध्दींगत होते ?

 आशावादीवृत्तीमुळे शारीरिक/मानसिक आरोग्य कसे वृध्दींगत होते ?

१. आशावाद हा प्रेरणेचा एक प्रमुख स्त्रोत प्रेरणा व्यक्तीला कृती करायला उद्दीपीत करतात, आणि त्यातून सकारात्मक उद्दीष्ट प्राप्ती होते. काहीच न केल्यास उद्दीष्टपूर्तीचा प्रश्नच येत नाही. जेव्हा व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते व व्यक्तीचा कस लागतो, व्यक्ती निराशेच्या खायीत गेलेला असतो. तेव्हा आशावाद व्यक्तीला काहीतरी कृती करण्यास उद्युक्त करतो. तर निराशावाद व्यक्तीच्या ध्येयपूर्तीतील प्रयत्नच थांबवतो. आशावादी व्यक्ती जीवनातील वाईट घटनेला तात्पूरता अडथळा समजतात व अशा कुठल्याही दुर्देवी घटनांना तीव्र नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया प्रकट न करता प्रतियोजनाचे परिणामकारक मार्ग शोधतात.

२. प्रभावी प्रतियोजन तंत्राचा अवलंब आशावादी व्यक्ती तणाव ग्रस्त प्रसंगांत, दुःखद प्रसंगांत प्रभावी प्रतियोजन तंत्रांचा अवलंब करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवतात, आशावादी सक्रीय प्रतियोजन तंत्रांचा अधिक अवलंब करतात. आव्हानांना सरळ सरळ सामोरे जातात. समस्या भिजत न ठेवता समस्येचे मूळकारणच नष्ट करतात. निराशावादी व्यक्ती कृती करण्याऐवजी समस्येचे काल्पनिक उत्तर शोधण्यात वेळ दवडतात. इतरांचा पाठींबा घेण्याऐवजी आपल्या कोषात जावून बसतात त्यामुळे त्यांचे सामाजिक संबंध वाढण्याऐवजी कुंठीतच होतात, त्यामुळे ते अधिकच दुःखी होतात.

३. लवचिक प्रतियोजन उपाय आशावादी व्यक्ती प्रतियोजन उपाय - शोधतात. गंभीर आजारांना सामोरे जातांना अनेक अनावश्यक उपायांचा विचार करण्याऐवजी प्रभावी एकमेव उपाय निवडतात. एखादी समस्या दिर्घकाळ भिजत न ठेवता समस्या त्वरीत सोडवतात.

४. सकारात्मक भावनाची अनुभूती (Broaden & Build Theory) आशावादीवृत्ती अनेकदा सकारात्मक भावनाशीलता अनुभूतीस मदत करते. तसेच फ्रेडरिकसनच्या ब्रॉडन ॲन्ड बील्ड (Broaden & Build Theory) उपपत्तीनुसार नवनवीन अनेकविध मार्गांचा अवलंब करण्यास ब्रॉडन असे म्हणतात. विस्तारित सकारात्मक विचार चौकटीमुळे व्यक्ती विविध कौशल्ये व साधने उपलब्ध करतात. त्यामुळे सृजनशील पध्दतीने समस्या सुटण्यास मदत होते.

.  आशावाद आणि सकारात्मक भावना संबंध - सकारात्मक भावना संबंधामुळे सुखद भावनाशीलता तर प्रकार होतेच, आशावाद व पण उत्तम शारीरिक आरोग्यही त्यामुळे प्राप्त होते. याउलट नकारात्मक भावना रोगप्रतिरोधक कार्यप्रणाली कमकूवत करतात तर सकारात्मक भावना आजारांशी झगडण्याची क्षमता वृध्दींगत करतात.