SY /TY मनोविकृती वर्गीकरण, DSM - 5 वर्गीकरण प्रणाली, Psychology Free Notes, DSM 5 CLASSIFICATION IN MARATHI

 


(DSM-V) (Classification of Mental Disorder-DSM-V ICD-10):

अमेरिकन मनोचिकित्सा संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निदानात्मक व सांख्यिकीय माहिती पत्रकात (Diagnostic & Statistical Manual) मनोविकृतीचे वर्गीकरण दिलेले आहे. आतापर्यंत DSM प्रणालीच्या 1, II, III, IV आवृत्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. ८ मे २०१३ ला DSM प्रणालीची आवृत्ती प्रकाशित झालेली आहेत.

DSM-V व ICD-10 नुसार मनोविकृतीचे वर्गीकरण तीन भागात करण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे

a) भाग - 1 (Section-1) :

DSM-V प्रणालीच्या या पहिल्या भागात प्रणालीतील प्रकरण सुचीचे माहिती वर्णन केलेली आहे. DSM-V ने DSM-IV चे बहुवर्गीकरण बंद करून अक्ष I अक्ष II व अक्ष III यातील सर्व विकृतीचा समावेश दुसऱ्या भागात एकत्रित केलेला आहेत. त्याचबरोबर DSM-IV मधील अक्ष पद्धती देखील वगळण्यात आलेली आहे.  तसेच DSM-V हे वर्गीकरण प्रणाली वापर सम्बंधी सूचना सांगितल्या आहेत.

b) भाग - II (Section II) :

१) मनोवैकसिक विकृती (Neuro developmental disorder) 

a) बौद्धिक अक्षमता विकृती (Intellectual disorder)

b) संप्रेषण विकृती (Communications Disorder) 

c) स्वमग्नता विकृती (Autism disorder)

d) कारक विकृती (Conduct disorder)


२) छिन्नमनस्कता आणि इतर मनोविकृती (Schizophrenia & other psychosis) 

a) छिन्नमनस्कता सदृश विकृती (Brief psychotic )

b) छिन्न भावात्मक विकृती (Schizoettective dis)

c) छिन्न मनस्कतावत विकृती ( Schizophreniform) 

d) संभ्रातीजन्य विकृती (Delusional disorder)


३) धृविय आणि संबंधित विकृती (Bipolar & Related)

a) धृविय 1 विकृती व धुविय ॥ विकृती 

b) इतर विशेष आणि संबंधित विकृती

(Other Specified & bipolar & Related Disorder). 

c) चिंतेशी संबंधित धुविय विकृती


४ ) अवसाद विकृती (Depression Disorder) 

a) अनियमित विघातक भाव विकृती

(Disruptive mood dysregulation disorder - DMDD)

b) मासिक स्रावाच्या काळातील विकृती

(Premenstrual dysphoric disorder)

c) आत्महत्या (Sucidality)

d) अवसाद (Dysthemia)


५) चिंता विकृती (Anxiety disorders) 

a) दुर्भिती (Phobia) व दुर्भितीचे प्रकार

b) आंतकित विकृती आणि अगोराफोबिया (Panic disorder & Agoraphobia)

(c) सामाजिक चिंता विकृती (Socialanxiety disorder) 

d) विलगता चिंता विकृती (Separation anxiety)

e) निवडक बधिरता (Selective mutism)


६) विचारकृती अनिवार्यता व संबंधित विकृती (Obsessive Compulsive Disorders)

(a) केशोच्छादी/केस ओढण्याची विकृती (Trichotillomania disorder) 

b) त्वचेवर टोचुन घेण्याची विकृती (Excoriation disorder or skin piking)

c) शरीर व्यंगरूप भ्रम विकृती व वस्तु जतन करण्याची विकृती (body dysmorphoric disorder & hording disorder)

d) इतर विशेष विचार-कृती अनिवार्यता संबंधित विकृती  (other specified obsessive compulsive disorder & related disorder)


७) आघात आणि तणाव संबंधित विकृती (Truma & Stress Related Disorders)

a) तीव्र तणाव विकृती (Acute Stress disorder)

b) आघात पश्चात तणाव विकृती (post trauma disorder)

c) प्रतिबंधित सामाजिक संबंध विकृती (Disinhibited social enagment disorder)

d) प्रतिक्रिया जवळीकता विकृती (Reactive attachment disorder)


८) वियोजित विकृती (Dissociative disorders) 

a) व्यक्तित्व अप्रतिती विकृती (Depersonalization disorder)

b) वियोजित फ्युग (Dissociative Fuge)

c) वियोजित स्व-ओळख विकृती (Dissociative identity disorder) 

d) वियोजित स्मृती लोप (Dissociative amnesia)


९) दैहिक लक्षणे आणि संबंधित विकृती (Somatic Symptoms & Related Disorder)

a) दैहिक लक्षणे व संबंधित विकृती ( somatic symptoms & related disorder)

b) दैहिक लक्षण विकृती (somatization disorder)

c) रूपांतरित विकृती (conversion disorder)

d) आजार विषयक चिंता विकृती (Illness anxiety)

e) आजार ढोंग विषयक विकृती (Factitious disorder)


१०) खाण्याशी संबंधित विकृती (Feeding & eating disorder) 

a) क्षुधातिरेक आणि खाऊन वमन करण्याची विकृती (Bulimia & binge eating disorder)

b) क्षुधाभाव चेतापदशा विकृती (Anorexia disorder) 

c) जेवणाकडे दुर्लक्ष करण्याची विकृती (Avoidant restrictive food intake disorder)


११) झोपेच्या संदर्भातील विकृती ( Sleep-wake disorder)

a) निद्रानाश विकृती (Insomnia)

b) अतिनिद्रा दोष (Hypersomnia)

c) नार्कोलेप्सि (Narcolepsy)

d) श्वसन क्रियेशी संबधित विकृती (Breathing related sleep disorder)

i) अवरोध निद्रा दोष विकृती (Obstructive sleep disorder)

ii)हायप्रोव्हनिलेशन निद्रा दोष (Hypoventilation) 

iii) हायपो अॅप्निआ सेंट्रल निद्रा दोष (Hypopnea central sleep Opnea)

f) सकैडियन रिदम स्लिप डिसऑर्डर व झोपेत चालण्याची विकृती (Circadian rhythm sleep-wake disorder)

 g) जलद नेत्र हालचाल व झोपेत पाय आखडण्याचा निद्रादोष 


१२) लैंगिक अपकार्य दोष विकृती (Sexual dysfunctions disorder) 

a) स्त्रियामधील लैंगिक उत्तेजना विकृती (Female sexual arousal disorder)

b) लैंगिक अपकार्य दोष (Sexual dysfunctions)

(c) जननेंद्रिय/ ओटीपोटात वेदना किंवा अंत क्षेपण विकृती (gentio-pelvic pain / pentration disorder)

(d) लिंग अस्वस्थता विकृती (Gender dysphoria).

(e) परालैंगिक विकृती (Paraphilic disorder) 


१३) विघातक विकृती, उर्मी नियंत्रण आणि वर्तन विकृती (Disruptive, implues-control & conduct disorders) 

a) समाजविघातक विकृती (Anti Social disorder) 


b) विरोधात्मक / उर्मट वर्तन विकृती (Oppositional defiant disorder) 

i) रागीट अविवेकी भाव ( angry mood)

ii) भांडखोर वृत्ती (argumentative/defiant behaviour)

iii) खुनशी वर्तन (Vindictiveness)


c) कारक वर्तन विकृती (Conduct disorder) 


१४) आम्ली पदार्थ आसक्ती संबंधित विकृती (Substenace related & addictive disorder)

a) जुगारी विकृती व तंबाखु आसक्ती विकृती (Gambling disorder & Tobacco abuse disorder) 

b) आम्लपदार्थाचा दुरपयोग व आम्लीपदार्थ अवलंबित्व (Substance abuse & substance dependence 


१५) मनोबोधनिक विकृती (Neuro cognitive) 

a) भ्रमिष्टपणा (Delirium)

b) अवमनस्कता (Dementia)

c) स्मृतीभ्रंश (Amenstic disorder) disorder)


१६) व्यक्तिमत्त्व विकृती (Personality disorder) 

a) विलक्षण अथवा असाधारण विक्षिप्त व्यक्तीमत्त्व

i) संभ्रांतीजन्य व्यक्तिमत्त्व विकृती 

ii) छिन्नमनस्कता जन्य व्यक्तिमत्त्व विकृती 

iii)छिन्नमनस्कता सदृश्य व्यक्तिमत्त्व विकृती 


b) नाटकी, भावनिक अथवा लहरी वर्तन विकृती

(i) समाज विरोधी व्यक्तिमत्त्व विकृती

(ii) सिमावर्ती व्यक्तीमत्त्व विकृती 

iii) नाटकी / हिस्ट्रानिक व्यक्तीमत्त्व विकृती 

iv) स्वरति व्यक्तीमत्त्व विकृती 


c) चिंताक्रांत व भयग्रस्त व्यक्तिमत्त्व विकृती 

i) प्रतिबंधात्मक व्यक्तिमत्त्व विकृती

ii) परावलंबी व्यक्तिमत्त्व विकृती 

iii) विचार-कृती अनिवार्यता व्यक्तिमत्त्व विकृती


भाग III (Section-III)

DSM-V प्रणालीच्या या भागात मनोविकृती वरील उद्योन्मुख मापन आणि प्रारूप व उपचार पद्धतींचा विचार केलेला आहेत.

मनोविकृतीची कारणे (Cause of Abnormal behaviour) : मनोविकृतीची अनेक कारणे आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी केवळ खालील कारणांचा विचार करण्यात आलेला आहे.

१) जैविक कारणे :

जैविक कारणांमध्ये अनुवंशाने आलेल्या वारसा गुणांचा व जन्मपूर्व परिस्थितीतील घटकांचा समावेश होतो.

a) अनुवंशिकता :संपूर्ण शरीर हे पेशीने बनलेले असते.पेशी केंद्रस्थानी रंगसुत्राच्या २३ जोड्या असतात. व प्रत्येक रंगसुत्रात हजारो जीन्स (रंगमणी) असतात. जिन्स अनुवंशिक गुणांचे वाहक असतात. म्हणून जिन्सच व्यक्तीची जीवनमान दर्शवत असतात. रंगसुत्र व जिन्स मधील अनेक शारिरीक व मानसिक आजार होत असतात.

(b) मेंदुदोष :

मेंदुच वर्तनाचा खरा अधिष्ठाता समजला जातो. सर्व मानसिक क्रिया या मेदुद्वारेच नियंत्रित केल्या जातात. बोधावस्थेचे केंद्रही मेंदुतच स्थिर असते. म्हणून मेंदुत जखम, संसंग, विषारी पदार्थाचा प्रादुर्भाव, मेंदुगाठ इ. कुठल्याही  कारणामुळे रचनात्मक व कार्यात्मक दोष निर्माण झाल्यास विविध वर्तन समस्या निर्माण होतात. 

c) न्युरोट्रान्समीटर :

एक पेशी दुसऱ्या पेशींशी न्युरोट्रान्समीटरच्या माध्यमातून जोडलेली असते. भावस्थिती, अध्ययन, स्मृती, सर्तकता जागृतावस्था, निद्रा इ. मानसिक क्रियाशी न्युरोट्रान्समीटरचा संबंध दिसतो. न्युरोट्रान्समीटरच्या अल्प अथवा अतिरिक्त प्रम ाणातील स्रवणाचा विविध मनोविकृतीशी संबंध दिसतो. उदा. अतिरिक्त डोपामिनचा छिन्न मनास्कतेशी तर अल्प डोपामिनचा अवमनस्कता या विकृतींशी संबंध असतो.. याशिवाय शरीरातील अंत: स्रावाचे व्यस्त प्रमाण, रोग प्रतिकार क्षमता कमी होणे, स्वायत्त मज्जासंस्थेचे कार्य प्रभावित होणे इ. जैविक कारणे देखील सांगता येतील.

(२) मनोविकृतीची मानसिक कारणे :

यामध्ये स्वतः बद्दल चुकीचे संवेदन, लहान वयातील वंचना, किंवा आघात, अयोग्य बालसंगोपन, विकृत कौटुंबिक आकृतिबंध, समवयकांशी झालेले कु समायोजन इ. घटकाचा प्रामुख्याने समावेश होतो. 

i) स्वत्वाचे चुकीचे संवेदन : ज्या व्यक्तीना मी कोण आहे? या प्रश्नाची योग्य जाणीव असते त्या व्यक्तीचे स्व संवेदन वास्तविक असते. परंतु ज्या व्यक्तीची स्वत्व कल्पना ही अवास्तव, अपुरी व विसंघटित असते, त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असणारे संबंधही विसंघटित असतात. उदा. ज्या व्यक्तींना स्वतः बद्दल अहंगंड आहे त्या इतरांना तुच्छ लेखत असतात.


ii) वंचना / आघात :

लहानपणी पालकांकडून पुरेसे प्रेम व संगोपन न मिळणे, याला वंचना म्हणतात. यामुळे बालकांच्या व्यक्तिमत्वावर विपरित परिणाम होतात. सिग्मंड फ्राईड यांच्या मते अशी वंचना झालेली मुले एका ठराविक वैकसिक अवस्थेतच अडकून राहतात. त्यांचा मानसिक विकास खुंटतो. त्याचप्रमाणे लहान वयात जर व्यक्तीवर मोठा मानसिक आघात झाला असेल तर त्याचा गंभीर परिणाम व्यक्तीच्या स्व संकल्पनेवर होतो. अशा व्यक्तींना सतत असुरक्षित वाटत असते.

iii) संगोपन :

व्यक्तिमत्व विकासामध्ये बालसंगोपन हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अतिसंरक्षण किंवा अति कडक वागणे, मुलांकडून अवास्तव मागण्या करणे, मुलांचे अतिलाड करणे, शिस्त लावण्यातील अनियमितता, बालक-पालक संप्रेषणातील अभाव, पालकाचे चुकीचे आदर्श, गुन्हेगारी इ. कारणामुळे व्यक्तीम त्व विकासावर विपरित परिणाम होत असतो. (ii)

iv)विकृत कौटुंबिक आकृतीबंध :

कुटुंबात सतत भांडणे होणे, पालकांचे विक्षिप्त वर्तन, पालकांपैकी एकाचा मृत्यू, अथवा घटस्फोट, शारिरीक आजार, खुन, आत्महत्या, अशिक्षित पालक, कुटुंबातील पालकांचे समाजविघातक वर्तन इ. कौटुंबिक कारणामुळेही वर्तन विकृतः होत असते.


(३) मनोविकृतीची सामाजिक व सांस्कृतिक कारणे :

आर्थिक सामाजिक दर्जानुसार समाजाचा प्रभाव बदलत असतो. छित्रमनस्कता कनिष्ठ आर्थिक, सामाजिक गटात, तर भावात्मक विकृती ह्या उच्च आर्थिक सामाजिक गटात अधिक प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे काही समाजात संस्कृती विरोधी कल्पना व विश्वास मुलांमध्ये रुजवले जातात. त्यामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो.


 मानसोपचार तंत्रे व उपचार पद्धती 

मानसिक दृष्ट्या आजारी किंवा भावनिक दृष्ट्या प्रक्षुब्ध व्यक्तीवर मानसशास्त्रीयदृष्ट्या उपचार केल्यास त्याला मानसोपचार असे म्हणतात. यासाठी मानसशास्त्रज्ञ त्याच्या व्यावसायिक क्षमतांच्या आधारे मानसिक दृष्ट्या प्रक्षुब्ध व्यक्तीच्या वर्तनाला किंवा भावनिकतेला प्रभावित करून उपचार करतो. 

रॉटर (Rotter 1979) मानसोपचार ही एक सुनियोजित क्रिया असून जिचा उद्देश व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडवुन आणण्यासाठी केला जातो. वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी चिकित्सकाने केलेल्या तंत्राचे उद्देशपूर्ण नियोजन म्हणजे मानसोपचार होय "

किसर (Kisser) यांच्या मते "मानसशास्त्रीय तंत्राद्वारे भावनिक आणि वर्तन विषयक त्रासावर केला जाणारा उपचार म्हणजे मानसशास्त्रीय उपचार होय. 

मनोविकृती का निर्माण होते ह्याची कारणमीमांसा विविध मार्गाने केल्यामुळे त्या त्या अनुसरून विविध मानसोपचार पद्धती देखील उपलब्ध आहेत. Behaviour Therapy) :

१) बोधात्मक वर्तन उपचार पद्धती (Cognitive Behaviour Therapy) : 

बोधात्मक सिद्धांतानुसार मानसिक विकृती बऱ्याच वेळा सदोष विचार सरणीमुळे निर्माण होतात. त्यामुळे विकृतीवर उपचार करताना विचारसरणीतील दोष शोधुन ते नाहीसे करणे महत्त्वाचे असते. यामध्ये खालील तंत्राचा समावेश होतो.

a) तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पद्धती (REBT) :

बोधनामुळे भावना निर्माण होते. भावनेवर बोधन अवलंबुन असते. या दोन्ही आधारे वर्तन निर्माण होत असते. अल्बर्ट एलिस यांनी तर्कसंगत भावनिक वर्तन उपचार तंत्रे शोधुन काढले. त्याच्या मते बऱ्याच वेळा व्यक्तीला जाणवणाऱ्या तणावाचे मुळ कारण हे व्यक्तीच्या सदोष विचारसरणीतच असते. काही वेळा व्यक्ती अत्यंत अतर्किक विचार करत आणि कोणत्याही भावनांनी भारावून जाते. उदा. घटस्फोट झाला म्हणजे माझे आयुष्यच संपले. ह्या विचारांमुळे व्यक्ती स्वतःच्या भावनांचा तोल सांभाळु शकत नाही व विकृतीला बळी पडते. ह्या उपचार तंत्राद्वारे व्यक्तीला तिच्या अतार्किक विचारांची जाणीव करून देणे किंवा अशा विचारांमुळे ताण कसा वाढतो हे पटवुन दिले जाते.

b) बोधात्मक पुर्नरचना :

काही वेळा व्यक्तीच्या विचारातील विस्कळितपणामुळे अनुभवांचे चुकीचे संवेदन होते. ह्या उपचार तंत्राद्वारे विचारातील चुक व्यक्तीच्या निदर्शनास आणून दिली जाते.  

२) रुग्णकेंद्रित उपचार पद्धती (Client-centered Therapy) : 

रॉजर्स यांच्या मते या उपचार पद्धतीत रुग्णं व्यक्ती चिकित्सकाच्या मदतीने स्वतःच स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणते, तसेच या उपचार पद्धतीमध्ये रुग्णं व्यक्ती ही चिकित्सकापेक्षा अधिक सक्रिय असते. त्यामुळेच या उपचार पद्धतीला रुग्ण केंद्रित उपचार पद्धती असे म्हणतात.

रॉजर्सच्या मते, रुग्णांमध्ये स्वतःचा विकास घडवुन आणण्याची, वर्तनामध्ये सुधारणात्मक बदल घडवुन आणण्याची सुप्त क्षमता असते. या सुप्त क्षमतांची जाणीव जर समुपदेशकाने करून दिली तर तो स्वतःच स्वतःचा विकास करू शकतो. यासाठी चिकित्सकाने रुग्णं व्यक्तीला योग्य आधार देणे आवश्यक असते.

चिकित्सक हा रुग्णं व्यक्तीला स्वतःच्या समस्येशी संबंधित असलेल्या भावना मुक्तपणे व्यक्त करण्यात प्रोत्साहन देत असतो. रुग्णांच्या भावना या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या असु शकतात. चिकित्सक हा त्याचा विनाशर्त स्वीकार करतो व त्याचे स्पष्टीकरण करतो. रुग्णांत स्वविकास त्याच्याच मदतीने घडवुन आणला जातो.

इतर उपचार तंत्रे :

१) मनोविश्लेषणात्मक तंत्रे :

मनोविश्लेषणात्मक तंत्रामध्ये मुक्त साहचर्य तंत्र, स्वप्न विश्लेषण, संमोहन, संरक्षण यंत्रणाचे विश्लेषण इ. तंत्राचा समावेश होतो. 

a) मुक्त साहचर्य तंत्र (Free Association) :

या तंत्रात रुग्णांला आरामशीर बिछान्यावर शरीराचे सर्व स्नायु पुर्णतः शिथिल सोडून झोपण्यास सांगितले जाते. आणि रुग्णांला आपल्या मनात येणारे विचार कोणताही आडपडदा न ठेवता व्यक्त करण्यास सांगितले जाते.

b) स्वप्न विश्लेषण (DreamAanlysis) : 

फ्राईड याच्या मते 'स्वप्न' म्हणजे व्यक्तीच्या अबोध प्रेरणा जाणण्याचा राजमार्ग आहे. म्हणुनच या उपचार तंत्रात व्यक्तीला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ लावला जातो.

c) संमोहन (Hypnosis) :

संमोहनाचे तंत्र सुचनांवर आधारित असते. संमोहन तंत्रात व्यक्तीला संमोहित करून व्यक्तीच्या वाईट किंवा घातक स्वरूपाच्या सवयी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. दारूचे व्यसन अशा तंत्राद्वारे कमी करता येते. 

२) वर्तनवादी व अध्ययनवादी उपचार तंत्रे (Behaviorism & Learning Oriented Psychotherapy) :

या विचारसरणीवर आधारित खालील काही उपचार तंत्राचा आपण विचार करू 

a) प्रतिअभिसंधान (Counter Conditioning) : ह्या उपचार तंत्राचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रुग्णांला विशिष्ट उद्दिपकाला योग्य प्रतिक्रिया देण्यास शिकविणे आहे. दुर्भिती या मानसिक आजारावर या तंत्राचा प्रभावी वापर करता येतो.

b) पद्धतशीर विसंवेदन (Systematic Desensitization) :

या उपचार तंत्रात चिंता निर्माण करणारे प्रसंग आणि स्नायुंची ताणरहित अवस्था यांच्यात साहचर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यक्तीला चिंता निर्माण करणारे प्रसंग आठवण्यास सांगितले जाते व त्याचवेळी स्नायुवरील ताण ही काढून टाकण्यास सांगितले जाते. या तंत्रात व्यक्ती स्नायुवरील ताण कमी करून आपली चिंता क्रमशः कमी करण्यास शिकते म्हणून या तंत्राला पद्धतशीर विसंवेदन म्हणतात.

(c) परमुखी अभिसंधान :

वाईट अथवा घातक सवयी घालविण्याच्या दृष्टिने या तंत्राचा वापर केला जातो.

d) आकारण (Shaping) :

व्यक्तीला योग्य किंवा इच्छित प्रतिक्रिया शिकविण्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते. यामध्ये एखादा वर्तनप्रकार शिकविण्यासाठी घन प्रबलन दिले जाते. उदा. मुलांना या तंत्राच्या साहाय्याने अभ्यासाच्या योग्य सवयी लावता येतात.

e) प्रतिरुप अनुसरण (Modelling) :

या उपचार तंत्रात जी प्रतिक्रिया व्यक्तीला शिकवायची आहे ते प्रतिरूप व्यक्तीला दाखवले जाते व रुग्णं त्याचे अनुकरण करतो.